ॲप्रेंटिसशीपसाठी ७ लाखांचे उद्दिष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |


अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करावी : मुख्यमंत्री


मुंबई : राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीपचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१७ च्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्योजकांच्या सूचना विचारात घेऊन या सूचनांवर काम करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. तीन पाळ्यांमध्ये काम, ॲप्रेंटिसशीप नियमावलीतील कार्यपद्धती या सर्व बाबींमध्ये शासन विचार करेल. सर्व उद्योजकांनी http://www.apprenticeship.gov.in पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यावर नोंदणीची संख्या कमी असून अधिकाधिक उद्योजकांनी यावर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्योजकांना केले. ॲप्रेंटिसशीपचे प्रमाण वाढवून ७ लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेऊन सहभाग दिला तर उद्दिष्टपूर्ण करणे सहज शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांना निमंत्रित करुन येत्या १५ दिवसात सर्व ६ महसुली विभागामध्ये अशा प्रकारची बैठक घेण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे उद्योग समूह असून त्यातून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला अभ्यासक्रम तयार करण्याची मान्यता असल्याने उद्योजकांनी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेऊन पुढे यावे, त्यास राज्य सरकार परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@