कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |

अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेला थेट सवाल


मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्‍टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का, असा थेट सवाल करीत कोस्टल रोडबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा शब्दांत मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.

या कोस्‍टल रोडसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव काल शिवसेनेने महापालिकेच्‍या स्‍थायी समितीत दफ्तरी दाखल केला. त्‍यावरून आज मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकांरांशी बोलताना शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आशिष शेलार म्‍हणाले की, कोस्‍टल रोडच्‍या प्रियदर्शी पार्क ते बडोदा पॅलेस आणि बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सांगरी सेतू दक्षिणेकडील टोक या प्रकल्‍पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्‍त करण्‍याचा प्रस्‍ताव महापालिकेच्‍या स्थायी समितीमध्‍ये शिवसेनेने दाखल केला. त्यामुळे कोस्‍टल रोडबाबत शिवसेनेने आपली नेमकी भूमिका स्‍पष्‍ट करावी. ज्‍यावेळी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कोस्‍टल रोडसाठीच्‍या वेगवेगळया १७ परवानग्‍या तातडीने मिळविल्‍या. त्‍यामध्ये मत्स्य आयुक्‍त, भारतीय नौदल, एमसीझेडएमए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, कोस्‍टगार्ड, मुंबई हेरिटेज कमिटी, महाराष्‍ट्र मेरिटाईम बोर्ड, बीपीटी, एमओईए, एचपीसी, हार्बर इंजिनिअर, मरिड्राईव्‍हची तीन सदस्‍यीय समिती, मुंबई शहर जिल्‍हाधिकारी, मुख्‍य अग्नीशमन अधिकारी अशा सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांनी मिळवल्या. मात्र, त्यानंतर प्रकल्प सल्लागार नियुक्‍त करण्‍याचा प्रस्‍ताव महापालिका प्रशासनाने सादर केला मात्र स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव शिवसेनेने दफ्तरी दाखल केला. ‘स्टँडिंग’ कमिटीतली ‘अंडरस्टँडिंग’ न झाल्यामुळे ‘कन्सल्टन्सी’ला विरोध होतो आहे का, आणि मुंबईकरांना सुखसुविधा देण्‍यासच शिवसेनेचा विरोध आहे का, असा सवाल अॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईकरांसाठी अतिशय आवश्‍यक असलेला हा प्रकल्‍प जलद गतीने पुढे गेला पाहिजे हीच भाजपची भूमिका असून भाजप त्‍याचा पाठपुरावा करेल, असेही शेलार यांनी स्‍पष्‍ट केले.

@@AUTHORINFO_V1@@