सैराटची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘याड’ लावणार...
महा एमटीबी   20-Apr-2018
 
 
 
 
‘सैराटच्या नावाने चांगभलं' कार्यक्रम ‘झी टॉकीज’वर प्रसारित होणार 
 
 
संपूर्ण महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या ‘सैराट’ चाहत्यांसाठी सध्या ‘झी टॉकीज’ने आनंदाची बातमी दिली आहे. ‘सैराट’ची जादू आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मात्र ती चित्रपटाच्या माध्यमातून नाही तर चक्क चित्रपट चित्रित करतांना आर्ची, परश्या आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सेटवर काय गमती-जमती केल्या आणि चित्रपटातील सहकलाकारांनी त्यांना कश्याप्रकारे साथ दिली याची माहिती देणारा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 
 
                                 
 
 
 
‘सैराटच्या नावाने चांगभल’ नावाचा कार्यक्रम ‘झी टॉकीज’वर लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘सैराट फिवर’ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात तुम्हाला आर्चीचे झणझणीत संवाद तसेच परश्याचा बेभान करून सोडणारा डान्स... आणि हे सगळे पडद्यावर उतरवण्यामागची कथा प्रेक्षकांना 'सैराटच्या नावाने चांगभलं' या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम ‘झी टॉकीज’वर २९ एप्रिल पासून ४ रविवार दु. १२ वा. दाखवण्यात येणार आहे. 
 
 

 
 
 
त्यामुळे तुम्ही देखील सैराटचा पुन्हा एकदा ‘फिवर’ अनुभवायला तयार रहा आणि आर्ची, परश्या आणि नागराज यांचे खरेखुरे विनोद, गप्पा-टप्पा आणि पडद्यावरील गमतीदार किस्से पाहायला सज्ज व्हा.