छपाईची शाई संपल्याने नोटा छपाई बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : देशाला चलनी नोटा पुरवठा करणार्‍या नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईची शाईच संपली आहे. त्यामुळे नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये २०, १००, २००, ५०० च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम जाणविण्याची शक्यता आहे.
 
 
या प्रकरणात केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेल्या २० आणि १०० च्या नोटाच मंजूर न केल्याने, त्या नोटांची पूर्ण छपाई थांबली आहे. त्यात २०० आणि ५०० च्या नोटांच्या छपाईसाठी लागणार्‍या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यातही मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे. एप्रिलपासूनची केंद्राची नवीन ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गाफील कारभारामुळे नोटांच्या छपाईवर परिणाम झाला आहे.
 
आपल्या देशात नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते. देशातील चलनी नोटांपैकी नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात. या नोटांच्या छपाईसाठी लागणारी शाई ही परदेशातून मागविण्यात येते.
 
@@AUTHORINFO_V1@@