शाहिदच्या घरी पुन्हा हलणार पाळणा ?
महा एमटीबी   20-Apr-2018

 
 
बॉलिवुडमध्ये सिने तारकांचे आयुष्य म्हणजे जणु एक पुस्तक. ज्यात काहीही लपलेलं नसतं. मग ते त्यांची प्रेमकथा असू देत, त्यांचे लग्न किंवा त्यांची बाळंतपणं. करीना पासून लिसा हेडन पर्यंत सगळ्यांनीच समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्या आयु्ष्यातील महत्वाचे निर्णय किंवा घटना जाहीर केल्या आहेत. अशाच प्रकारचा एक इशारा आता मीरा कपूर म्हणजेच शाहिद कपूर याच्या पत्नीने दिला आहे. तिने इंस्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या कन्येचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
 
 
 
तिने आपल्या कन्येचा म्हणजेच मीशाचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये 'बिब सिस्टर' म्हणजेच 'मोठी बहीण' असे लिहीले आहे. यामुळे शाहिदच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार का? अशा चर्चेला आता उधाण आले आहे. मीराच्या या पोस्टवर केवळ १८९ मिनिटांमध्येच ५९४ प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यापैकी एकाला उत्तर देत तिने "It's going to be a fun ride" असे म्हटले आहे. म्हणजेच या इशाऱ्याला तिने दुजोरा दिला आहे.
मीशाच्या जन्माच्या आधी देखील शाहिदकडे नवीन पाहुणा येणार असल्याची घोषणा त्याने "उडता पंजाब" या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळेला मंचावरुन केली होती. त्यावेळी देखील सर्व माध्यमांमध्ये याविषयीच चर्चा होती, मात्र आता स्वत: मीरा कपूर हिने आगळ्या वेगळ्या पद्धतीने अशी घोषणा केली आहे, त्यामुळे पुढील काही दिवस आता सर्व माध्यमांमध्ये शाहिद, मीरा, मीशा आणि येणाऱ्या पाहुण्याविषयीच चर्चा सुरु राहणार असे दिसते.