प्लास्टिक पिशवी आढळल्यास फेरीवाल्यांचे परवाने रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

फेरीवाला धोरणात निर्णयाचा समावेश होणार

 
 
 
 
मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्यानुसार प्लास्टिक बंदी काळात जर फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळली तर त्यांचे परवाने रद्द केले जाणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फेरीवाला धोरणात या निर्णयाचा समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
गेल्या महिन्यात राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. यानंतर पालिकेने अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. फेरीवाला धोरण अंतिम टप्प्यात असून त्यामध्येही हे नियम समाविष्ट करण्यात येणार आहेत. फेरीवाले प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पालिकेने आवाहन करूनही नियमांचे पालन केले जात नाही. फेरीवाल्यांना धोरणानुसार पावसाळ्यापूर्वी परवाने दिले जाणार आहेत. फेरीवाल्यांनी प्लास्टिक पिशव्या वापरल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा कडक नियम तयार करण्यात आला आहे.
 
यामुळे प्लास्टिकला आळा घालण्यास मदत होईल. शिवाय वाढते प्रदूषण आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिकला आळा बसण्यास हा निर्णय फायदेशीर ठरेल, असे पालिकेचे म्हणणे आहे. गेल्या सहा महिन्यांत पालिकेच्या २३ बाजारपेठा प्लास्टिकमुक्त झाल्या आहेत. तसेच बाजारासाठी कागदी व कापडी पिशव्या वापरण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच उर्वरित सर्व बाजारपेठा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी फेरीवाला धोरण अंतीम करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यात प्लास्टिकबंदीबाबत कडक नियमांचाही समावेश केला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@