सनातनी स्पिलबर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018   
Total Views |



 
 


ज तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने प्रगती होत आहे. कालचा मोबाईल फोन आज तर आजचा उद्या कालबाह्य होईल, इतक्या झपाट्याने हे बदल होत आहेत. परंतु एकीकडे झालेल्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे लोक आहेत तर दुसरीकडे ज्या क्षेत्रातील तो बदल आहे, त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या विरोधाचा सामना त्याला करावा लागत आहे. अशाच द्विधा अवस्थेत असतानाच दृष्य माध्यमक्षेत्रात ‘नेटफ्लिक्स’ या व्हिडीओ स्ट्रीमिंग ऍपने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लाखो प्रेक्षक आज आपले आवडते चित्रपट पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा वापर करतात. परंतु या स्ट्रीमिंग ऍपमुळे सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा निखळ आनंद प्रेक्षक हरवत असल्याचे मत नुकतेच स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी केले आहे. पण त्यांचा हा विचार चित्रपटसृष्टीला रोचक तर नाहीच पण सनातनी देखील आहे.

नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे या बाबतही दोन मतप्रवाह आहेत. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात राहणार्‍या रिड हेस्टिंग्ज याचाही अनुभव असाच होता. रिडला सिनेमाचे वेड होते, पण एकदा भाड्याने आणलेली डीव्हिडी परत करण्यास तो विसरला आणि त्याला यासाठी ४० डॉलरचा दंड बसला. याच असूयेतून पुढे त्याने नेटफ्लिक्सहे नवे व्यासपीठ चित्रप्रेमींसाठी निर्मित केले.

त्याचप्रमाणे बरेच असे चित्रपट आहेत, ते सिनेमागृहात पाहणे नेहमी शक्य नसते. काही वेळेस आर्थिक कारणाने किंवा कधीकधी वेळ कमी असल्याने आवडणारा चित्रपट पाहायचे राहून जाते. यासाठी सध्याची पिढी टोरंटवरून चित्रपट डाऊनलोड करून पाहते. याला पायरसी म्हणतात. पण हल्ली प्रत्येकजण याच पद्धतीने चित्रपट पाहातो. हा ट्रेण्ड रूळण्यामागचे मुख्य कारण हे त्याच्या वापरात दडले आहे. टोरंटवरून चित्रपट डाऊनलोड करून तो मोबाईलमध्ये जतन केल्यावर हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या वेळेत पाहण्याचे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला मिळते आणि तेही फुकट. अर्थात फुकट ते पौष्टिक मानणारा मोठा वर्ग या देशात आहेच. त्यामुळे दिवसेंदिवस चित्रपटाचा पडदा संकुचित होत आहे, पण आशयाच्या कक्षा रूंदावत आहेत. मात्र यातून चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होत असल्याची ओरड सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे टोरंटसारख्या वेबसाईटवर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशातच सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या नवमाध्यमांतून याच निर्मात्यांना त्यांचा योग्य परतावा मिळू लागला आहे. त्यामुळे आशय निर्मात्यांना एक माध्यम देण्यात नेटफ़्लिक्स यशस्वी झाला आहे. त्यामुळे पारंपरिक माध्यमांवरील बेचव आणि रटाळ मालिकांना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग नेटफ्लिक्सने कमावण्यास सुरुवात केली आहे.

 
त्याचसोबत तांत्रिकदृष्ट्या नेटफ्लिक्स उच्च आहे. याचा फायदा हा दोन्ही वर्गांना झाला आहे. नेटफ्लिक्स या नवमाध्यमामुळे अनेक प्रयोगशील निर्मात्यांना नेटफ्लिक्समुळे आपला आशय दाखवण्याची वेगळी संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात आणि यापुढील काळात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, हॉट स्टार ही नवमाध्यमेच प्रमुख माध्यमे म्हणून प्रस्थापित होतील, यात शंका नाही. त्यामुळे आगामी काळात नवनिर्माते, हौशी दिग्दर्शक, कलाकार यांच्यासारख्या वर्गाला यातून मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ७० एमएम स्क्रीन तळ हातावर मावणार्‍या मोबाईलची जागा घेईल आणि दर्शक या नवमाध्यमाला आपलेसे करतील, कारण ही नवमाध्यमे दर्शकांचा वेळ वाचवणारी आणि सहजतेने उपलब्ध असणारी ठरतील. नेटफ्लिक्स कुठेही पाहता येते फोनवर, टीव्ही, कॉम्युटरवर. त्यामुळे या नवमाध्यमांचा वापर हवा तसा करता येतो. ज्याला बंधन नसते आणि ज्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा नसतात अशा गोष्टी माणसांना जास्त आकर्षित करतात. मग ते मनोरंजनाच्या नव्या पद्धतीमधले असले तरीही त्याचा प्रत्येकाकडून स्वीकारच होतो. त्यामुळे स्पिलबर्ग यांचे वक्तव्य फार मनावर घेण्याचे काहीच कारण नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@