'रेड' चित्रपटातील अम्मांचा हा जुना व्हिडियो बघितला का?
महा एमटीबी   02-Apr-2018

 
मुंबई :  आता पर्यंत 'रेड' हा चित्रपट अनेकांनी बघितला. त्यामध्ये सगळ्यांच्याच आभिनयाची स्तुती करण्यात आली मात्र सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला अभिनय आहे तो म्हणजे सौरभ शुक्ला यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या अम्मांचा. जबलपूरच्या पुष्पा जोशी यांनी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर त्यांचे अनेक व्हिडियो व्हायरल झाले.
 
 
 
 
 
मात्र हा व्हिडियो अधिकच खास आहे. यामध्ये पुष्पा जोशी स्वत: अतिशय गोड आवाजात 'कंकरिया मार के जगाया' हे गाणं म्हणत आहेत. अत्यंत घरगुती असा हा व्हिडियो आहे, मात्र यामधील पुष्पा जोशी यांचा गोड आवाज आणि निरागस हास्य यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
 
गेल्या काही दिवसांआधी प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने पुष्पा जोशी यांचा एक व्हिडियो शेअर केला होता. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये अम्मा विषयी उत्सुकता वाढू लागली. त्यातून काही वर्षांआधी यूट्यूबवर टाकण्यात आलेला हा जुना व्हिडियो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.