अमिताभ बच्चन म्हणतायंत शेफाली वैद्य यांचा 'हा' अनुभव नक्की ऐका!
महा एमटीबी   02-Apr-2018


 
गोवा मुक्ती संग्राम आणि एकूणच गोव्यातील त्याकाळची पार्श्वभूमी, पोर्तुगीजांनी हिंदू जनतेवर केलेले अत्याचार या विषयावर प्रसिद्ध स्तंभ लेखिका यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव कथन केले आहेत. या विषयीचा व्हिडिओ शेफाली वैद्य यांनी ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आहे. या व्हिडिओला २६ हजाराहून अधिक व्हूज मिळाले असून अकराशे पेक्षा अधिक नेटिझन्सनी वैद्य यांचे ट्विट रिट्विट केले आहे. पण या सगळ्यात उल्लेखनीय बाब ही आहे की जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही शेफाली वैद्य यांचा अनुभव त्यांचे विचार कदाचित पटले असावेत व त्यामुळेच त्यांनी वैद्य यांचे ट्विट रिट्विट केले. रिट्विट करताना त्यांनी 'listen' ही एकाच कंमेंट केली आहे.