चला एका उत्तम भविष्याकडे ; राष्ट्रकुल देशांच्या एकसूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |




लंडन :
जगासमोर सध्या अनेक आव्हाने आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे आता सर्व राष्ट्रकुल देशांनी एकत्रितपणे जगाच्या हिताच्या दृष्टीने कार्य केले पाहिजे, असे आवाहन ब्रिटेनच्या राणी एलिझाबेथ-ll आणि पंतप्रधान थेरेसा मे यांनी केले आहे. तसेच यापुढे एका उत्तम भविष्याच्या निर्मितीसाठी 'टूवर्डस अ कॉमन फ्युचर' अशा नवी संकल्पना राष्ट्रकुल देशांपुढे ठेवण्यात आली आहे.
ब्रिटेनची राजधानी लंडन येथे नुकतीच राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM) पार पडली. याबैठकीसाठी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या ५० हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख याठिकाणी उपस्थित झाले होते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील यावेळी या बैठकीला उपस्थित होते.
राष्ट्रकुल देशांनी आजपर्यंत अनेक प्रश्नांवर एकत्रितपणे उत्तरे शोधली आहेत. आता देखील बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अनेक नवे प्रश्न आपल्या समोर उभे राहत आहेत. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि राष्ट्रकुल परिवारातील देशांसह सर्व जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन मे यांनी यावेळी केले.


 
विशेष म्हणजे तब्बल २० वर्षानंतर राष्ट्रकुल देशांची बैठक ब्रिटेनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मान्यवर म्हणून ब्रिटेनच्या राणी एलिझाबेथ-lI आणि ब्रिटेनचे राजपरिवार देखील यावेळी उपस्थित होते. एलिझाबेथ यांनी देखील यावेळी सर्व देशांच्या प्रमुखांचे स्वागत केले. तसेच राष्ट्रकुल देशांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@