न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

न्यायालयीन याचिकांचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग होत असल्याची व्यक्त केली खंत

 
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी एस.आय.टी. कॉंग्रेस नेते तहसिन पूनावाला, बॉम्बे लॉयर्स असोसिएशन तर्फे दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निर्वाळा दिला असून हि याचिका फेटाळण्यात आली आहे.
 
 
महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक रित्या हृदयविकाराने झाल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस पथकाने केलेली चाचणी देखील ग्राह्य धरण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने याला मान्यता दिली. तसेच न्यायालयात केल्या जाणाऱ्या याचिकांचे राजकीय उद्द्येश्य सध्या करण्यासाठी वापर होत असल्याची खंत देखील सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
 
 
१ डिसेंबर २०१४ साली न्यायमूर्ती लोया यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ते आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले असताना हि घटना घडली होती. न्यायमूर्ती लोया हे सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात सी.बी.आय न्यायालयाचे न्यायाधीश होते. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचा राजकीय संबंध लावण्याचा प्रकार काही कॉंग्रेसी नेत्यांनी केला. मात्र आज त्याचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@