मॅडम तुसादमध्ये आता दिसणार करणचाही पुतळा
महा एमटीबी   19-Apr-2018

 
मुंबई :  करण जौहर एक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, स्टूडंट ऑफ द इयर या सारख्या अनेक चित्रपचांमुळे तर 'कॉफी विथ करन' या खास चॅट शो मुळे करन जौहर घरा घरामध्ये पोहोचले आहेत. मात्र आता मॅडम तुसाद या प्रसिद्ध वॅक्स म्यूझियम मध्ये मेणाचा पुतळा असलेले करण जौहर हे पहिले दिग्दर्शक ठरणार आहेत. करणने ही माहिती आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून दिली आहे.
 
 
 
मॅडम तुसाद्स मध्ये मेणाचा पुतळा असणे ही कुठल्याही सेलिब्रिटीसाठी एक महत्वाची बाब मानली जाते. त्यातून करणला असा पुतळा असणाऱ्या पहिल्या दिग्दर्शकाचा मान मिळणार आहे. १२ एप्रिल पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि ६ महिन्यांनंतर हा पुतळा उभारण्यात येईल. शहंशाह अमिताभ बच्चन पासून पंत्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मोठ मोठ्या दिग्गजांचा पुतळा येथे उभारण्यात आला आहे.
याबद्दल करण जौहर यांनी मॅडम तुसाद आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. या वर्षी करण जौहर यांच्या पहिल्या चित्रपटाला म्हणजेच "कुछ कुछ होता है" ला २० वर्षे पूर्ण होणार आहेत. तसेच कॉफी विथ करणचे ६ वे पर्व देखील ऑक्टोबर मध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे हे वर्ष म्हणजे करण जौहर यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरणार असे दिसते.