बाप रे बाप प्रिया वारियरचा काय हा अॅटीट्युड...
महा एमटीबी   19-Apr-2018
 
 
 

 
 
 
आपल्या नजरेने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री प्रिया वारियरचा हा अॅटीट्युड पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल. काही महिन्यांपूर्वी तिच्या नजरांनी संपूर्ण जगाला वेड लावले आता ती मंचच्या जाहिरातीमध्ये झळकली असून तिच्या या अॅटीट्युडमुळे ती सगळ्यांना चकित करतांना दिसत आहे.
 
 
 
 
 
सध्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात ‘आयपीएलचा सिझन’ सुरु आहे. त्यामुळे ‘आयपीएलचा’ची क्रेझ चांगलीच पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने या मंच कॅटबरीची जाहिरात केली असून सध्या ती सोशल मिडीयावर खूपच शेअर केली जात आहे. प्रिया वारियरचा या जाहिरातीमधील अंदाज पाहून तुम्ही घायाळ होवून जाल यात काही शंका नाही.
 
 
प्रिया वारियरच्या अदांनी सोशल मिडीयावर खूपच प्रसिद्धी मिळविली. यामुळे ती काही दिवस ट्रेंडमध्ये देखील राहिली. भारतातच काय इतर देशांमध्ये देखील तिच्या नजरेने सगळ्यांना वेड लावले. आता ती या मंचच्या जाहिरातीतून सगळ्यांना वेड लावायला आली आहे. तुम्ही देखील जरूर पहा ही जाहिरात...