बँकांकडे पुरेसी रोकड उपलब्ध : आरबीआय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |

नवी दिल्ली : काल देशामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेल्या चलनाच्या तुटवड्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली प्रतिक्रिया दिली असून देशामध्ये सर्व बँकांकडे पुरेसी रोकड उपलब्ध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच देशाच्या काही भागातील एटीएममध्ये पैसे नसल्याच्या ज्या बातम्या समोर येत आहेत, त्याची आरबीआय दखल घेत असून यावर लक्ष ठेवले जात आहे, असे देखील आरबीआयने म्हटले आहे.

चलनाच्या तुटवड्यावरून देशातील सर्व विरोधी पक्ष आणि माध्यमांनी सरकार आणि आरबीआयला घेरण्यास सुरुवात केल्यानंतर आरबीआयने या विषयी एक परिपत्रक काढून याला उत्तर दिले आहे. आपल्या परिपत्रकामध्ये आरबीआयने देशात कसल्याही प्रकारचा चलन तुटवडा नसल्याचे म्हटले आहे. तसेच माध्यमांकडून आरबीआयकडे चलनाचा तुटवडा असल्याचे जे वृत्त दाखवले जात आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे सांगत आरबीआयच्या व्हॉलेट आणि करन्सी चेस्टमध्ये आवश्यक तेवढी रोकड उपलब्ध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच चलन छपाईचे काम देखील वेगाने सुरु असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

देशांमध्ये काही ठिकाणी निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावर भाष्य करताना, आरबीआययाकडे जातीने लक्ष देत असल्याचे सांगितले जात आहे. देशातील काही भागांमध्ये एटीएममध्ये पैसे नसल्याच्या वृत्त सध्या समोर येत आहे, परंतु बँकांकडे देखील पुरेसे रक्कम उपलब्ध असून एटीएममध्ये नवीन भरणा अथवा त्याच्या सॉफ्टवेअरच्या आधुनिकीकरणामुळे एटीएमच्या कामात अडथळा निर्माण झाला असण्याची शक्यता आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. परंतु यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देखील आरबीआयने दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@