पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |

लंडन : युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ब्रिटेनमध्ये पोहोचलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आहे. थेरेसा मे यांच्या लंडनमधील निवासस्थानी ही भेट झाली असून ब्रिटेनमधील आपल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी यांनी मे यांच्यासह ब्रिटेनमधील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत.
'गेल्या काही वर्षांपासून भारत आणि ब्रिटेन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अत्यंत चांगली वाढ झाली आहे. भारताने सुरु केलेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'मध्ये देखील ब्रिटेनने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे भारत आणि ब्रिटेनची मैत्री ही जगासाठी देखील अत्यंत लाभदायक असल्याचे ब्रिटेनने सिद्ध केले आहे,' असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच यंदाची ही ब्रिटेन भेट दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.
थेरेसा मे यांनी देखील यावेळी भारत आणि ब्रिटेन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले. भारत आणि ब्रिटेन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सध्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढता निघाले आहेत. याचा फायदा दोन्ही देशांबरोबरच सर्व जगाला देखील होईल, असा विश्वास मे यांनी यावेळी व्यक्त केला.

 
आपल्या पाच दिवसीय युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी हे आज सकाळी ब्रिटेनमध्ये पोहचले आहेत. ब्रिटेनमध्ये ते एकूण तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. या तीन दिवसात ब्रिटेनच्या राणी एलिझाबेथ आणि राज परिवारातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची ते भेट घेणार आहेत. यानंतर नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या प्रमुखांशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी ब्रिटेन पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करून ब्रिटेनबरोबर काही महत्त्वपूर्ण करार ते करणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@