गोविंदा दिसणार आता पुन्हा नव्या अंदाजात
महा एमटीबी   18-Apr-2018
 
 
 
 
 
 
बॉलीवूडमध्ये छोटे मिया म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आता पुन्हा नव्या अंदाजात आपल्याला दिसणार आहे. ‘फ्राय डे’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये गोविंदा पुन्हा त्याच्या जुन्या अंदाजात म्हणजेच मस्तीखोर आणि नटखट रुपात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ‘फुकरे फेम’ अभिनेता वरुण शर्मा त्याला साथ देणार आहे.
 
 
 
 
 
या चित्रपटाच्या पोस्टरवरून असे दिसते की, गोविंदा पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीचा तडका लावणार असून त्यांच्या चाहत्यांना पुन्हा जोरदार हसविणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर गोविंद पडद्यावर येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या सोबत गोविंदा याने कॉमेडी चित्रपट केले, ते फारसे चालले नसले तरी देखील ‘बडे मिया आणि छोटे मिया’ ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. 
 
 
 
 
याच पद्धतीची काहीशी कॉमेडी गोविंदा आणि वरुण मिळून या चित्रपटात करणार आहे. दिग्दर्शक अभिषेक डोगरा याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट २५ मे या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपल्या कॉमेडीचा तडका गोविंदा पुन्हा लावू शकतो काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.