बेळगावमध्ये ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
कर्नाटक : कर्नाटकातील बेळगाव येथील विश्वेश्वरय्या नगर येथे ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी धाड टाकून जप्त केल्या. या जप्त केलेल्या नोटांमध्ये २ हजारच्या आणि ५०० च्या बनावट नोटांचा समावेश आहे.
 
 
विश्वेश्वरय्या नगर परिसरातील वर्दळ नसलेल्या सरकारी क्वार्टर्समधील घरात या बनावट नोटा आढळून आल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुका १२ मे रोजी होणार आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या आधी या बनावट नोटा जप्त झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या बनावट नोटा प्रकरणांमध्ये सहभागी असलेला विजापूरचा रहिवासी अजीत कुमार निदोनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
या गुन्हाची नोंद करण्यात आली असून मुद्रण यंत्र, पेपर आणि चलनातून बाद केलेली १ हजार रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या नोटा मिळाल्यामुळे आगामी निवणुकीत या नोटा मत वळवण्यासाठी वाटल्या जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच आरोपींवर निवडणूक संबंधित गुन्हे आणि बनावट नोटा संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले जातील असेही सांगण्यात येत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@