कलिंगड - उन्हाळ्यातील एक वरदान
महा एमटीबी   17-Apr-2018
 
 
 
नुकताच उन्हाळा चालू झाला आहे. चैत्र, वैशाख महिन्यातील ऊन म्हणजे अंगाची नुसती लाही करणारे ऊन. थंडीच्या थंडगार मोसमातून अलगतपणे ऋतू आपल्याला छटा बदलताना दिसतो. बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे असते. आरोग्याची काळजी आपण घेतली नाही, तर या दिवसांमध्ये त्याचे परिणामआपल्याला लगेच दिसून येतात. उन्हाच्या दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन करणे गरजेचे असते. उन्हाळ्याच्या या तप्त ऋतूमध्ये एक महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. या फळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असल्याने व विपुल प्रमाणात पाणी असल्याने त्याचा फायदा आपल्याला शरीराला होतो. कलिंगडामधून जीवनसत्व अ, ब-६ आणि क खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेंट्‌स आणि अमिनो अॅसिड सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळतात.
 
कलिंगडाचे आपल्या शरीराला होणारे फायदे : 
 
१. कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्त चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते.
२. शरीरातील कामोत्तेजकता वाढण्यास कलिंगड मदत करते.
३. जर तुम्हाला डोळ्याच्या तक्रारी असतील तर तुम्ही कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर राहील.
४. कलिंगडामुळे तुमचा मूड ठीक होण्यास मदत होईल.
५. या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कलिंगडाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरेल.
६. कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते.
७. कलिंगडामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात.
८. उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते.
९. आपल्या शरीरामध्ये असणार्‍या स्नायूंना कलिंगडामुळे बराच फायदा होत असतो.
१०. कलिंगड हा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे शरीरामध्ये तयार झालेली घाण आपल्याला शरीराबाहेर काढता येते.
(लेखिका रिजॉईस वेलनेस येथे आहारतज्ज्ञ आहेत.)
 
 
 
- डॉ. अस्मिता सावे