न्यायालयाकडून सलमानच्या परदेश वारीला हिरवा कंदील
महा एमटीबी   17-Apr-2018
 
 
 
 
 
 
 
जोधपुर : काळवीट प्रकरणात अडकलेला अभिनेता सलमान खान याच्या परदेश वारीला आता न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. काळवीट प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेल्या सलमान खानला आज जोधपुर न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणामुळे सलमानच्या परदेश वारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
 
 
 
मात्र आता या प्रश्नांना पूर्णविराम देत न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै २०१८ या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जाणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान याला परदेश दौरे करावे लागतात. मात्र इतके दिवस सलमानच्या परदेश दौऱ्यावर बंदी असल्याने त्याचा परदेश प्रवास बंद होता.
 
 
आता सलमानच्या परदेश दौऱ्याला न्यायालयाने हिरवा कंदील दिला असल्याने सलमान खान याला परदेश दौरा करता येणार आहे. मात्र त्याला विशीष्ट कालावधीतच हे दौरे करावे लागणार आहेत.