कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर
महा एमटीबी   16-Apr-2018
 
 
 
 
 
 
मुंबई : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ काल मुंबई येथील कार्टर रस्त्यावर सर्वसामान्यांसह बॉलीवूड कलाकारांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. यावेळी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. अमानुष अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी हे सगळे बॉलीवूडकर काल संध्याकाळी रस्त्यावर उतरले होते.
 
 
   
 
 
अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री आणि नृत्यांगणा हेलन, अभिनेत्री अदिती राव हैदरी, अभिनेत्री कल्की कोचलीन, दिग्दर्शक किरण रावसहित अनेक सिनेकलाकार यावेळी उपस्थित होते. सगळ्यांनी हातात निषेधाचे पोस्टर घेवून या घटनेला विरोध केला आहे. या मुलीला लवकर न्याय मिळावा तसेच त्या नराधमांना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे सगळे काल रस्त्यावर उतरले होते.