'सर्व हिंदू आमच्या बाजूने'
महा एमटीबी   16-Apr-2018

असिफांच्या पालकांची माध्यमांसमोर माहिती 

कठुआ :
कठुआ हत्याकांडाप्रकरणी असिफाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थानिक हिंदू नागरिक आमच्या पाठीशी असून हिंदू समुदाय मुस्लिमांना धमकावत असल्याचे चित्र जाणूनबुजून तयार केले जात आहे, अशी प्रतिक्रिया असिफाच्या वडीलांनी दिली आहे. तसेच या घटनेला कसलाही प्रकारचा धार्मिक रंग न देता आरोपींवर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील त्यांनी आपल्या वक्तव्यातू केली आहे.


प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन हिने असिफाच्या वडिलांचा हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यामध्ये एक पत्रकार असिफाच्या वडिलांना कठुआमध्ये सुरु असलेल्या घटनांबद्दल प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहेत. पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देतांना, याठिकाणी सर्व हिंदू नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कठुआतील स्थानिक हिंदू नागरिकांनीच आम्हाला याठिकाणी वसवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी हिंदू-मुस्लीम भावंडांना सारखे राहत आले आहेत. असिफाबरोबर ही घटना घडल्यानंतर अनेक हिंदू स्त्रियांनी देखील अश्रू गाळले होते आणि तिला न्याय मिळावा म्हणून सर्व हिंदू समुदायाने आम्हाला पाठींबा दिला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच सध्या काही ठिकाणी कठुआतील हिंदू नागरिक येथील मुस्लीम समुदायाला धमकावत असल्याचे चित्र तयार केले जात आहे. हिंदू गुजरातच्या दंगलींची आठवण मुस्लिमांना करून देत आहेत, असे देखील सांगितले जात आहे. परंतु या सर्व गोष्टी खोट्या असून असे काहीही याठिकाणी घडलेले नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच सर्व आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहूनच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.