बलात्काराच्या घटनांमुळे संतापले आनंद महिंद्रा
महा एमटीबी   16-Apr-2018

 
देशभर घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा संतापले असून, त्यांनी ट्वीटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. ते म्हणतात की, यावर शांत बसून काहीही मत व्यक्त न करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, परंतु देशभर घडणाऱ्या घटनांकडे पाहून माझे रक्त सळसळत आहे, आणि त्यामुळे मला व्यक्त होण्यापासून स्वत:ला आवरता आले नाही.
 
 
आनंद महिंद्र पुढे लिहितात की, मला नेहमीच जल्लादची नोकरी जाचक वाटते, मात्र बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी जल्लाद देखील बनायला तयार आहे. अशा शब्दांत त्यांनी एकूण प्रकारावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
उन्नाव, कठुआ यानंतर सुरात येथे देखील एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्याविरोधात देखील देशभरातून आवाज उठवले गेले आहेत. या घटनेची चौकशी सुरु आहे. आज कठुआ येथील घटनेवर देखील न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे.