श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल काय म्हणतायेत बोनी कपूर ?
महा एमटीबी   15-Apr-2018
 
 
 
मुंबई : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'मॉम' या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीदेवी यांची काहा काही दिवसांपूर्वीच अत्यंत दुर्दैवी मृत्यु झाल्या कारणाने त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक अत्यंत भावनिक बाब होती. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्वच स्तरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र या बाबतीत त्यांचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक होते. 

नुकतेच श्रीदेवी यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन बोनी कपूर तसेच जान्हवी आणि खुशी कपूर यांनी तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"हा आमच्यासाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. परीक्षकांनी श्रीदेवी यांचे नाव या पुरस्कारासाठी निव़डले ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. श्रीदेवी यांनी त्यांच्या ३०० हून अधिक चित्रपटांमधून आपले कतृत्व गाजवले आहे. त्या खऱ्या अर्थाने एक 'परफेक्शनिस्ट' आहेत. त्या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाहीत तर एक उत्तम पत्नी आणि आई देखील आहेत. हाच तो क्षण आहे जेव्हा आपण त्यांच्या जीवनाचा त्यांना मिळालेला यशाचा उत्सव साजरा केला पाहीजे. आज त्या आपल्या सोबत नाहीत, मात्र त्यांचा वारसा तो नेहमीच आपल्यासोबत आहे. आम्ही त्यांना मिळालेल्या या यशासाठी भारत सरकार तसेच मान्यवर परीक्षकांचे आभार मानतो. तसेच आम्ही त्यांच्या सर्व मित्र परिवाराचे आणि चाहत्यांचे देखील आभार मानतो." 

जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर 

 

 असे म्हणत जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर यांनी आपले आभार व्यक्त केले आहे आहेत. श्रीदेवी यांना 'मॉम' या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीमुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र दर्दैवाने हा पुरस्कार घेण्यासाठी आता त्या या जगात नाहीत. हा पुरस्कार मिळाल्याने श्रीदेवी यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.