९५ वर्षाच्या सेवानिवृत्त शिक्षक गैधल तावडे यांची तरुण पिढीच्या भविष्यासाठी बुराई परिक्रमेत ७ कि.मी.ची पायपीट
महा एमटीबी   15-Apr-2018
 

 
९५ वर्षाच्या सेवानिवृत्त शिक्षक गैधल तावडे यांची तरुण पिढीच्या भविष्यासाठी बुराई परिक्रमेत ७ कि.मी.ची पायपीट
 
 
शिंदखेडा ः
मी देशाला पारतंत्र्यात पाहिले आहे, मी १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिक्षक म्हणून रामी ता. शिंदखेडा येथे नोकरीला लागलो, १९८२ ला सेवानिवृत्त झालो, मी बुराई नदीच्या काठावर असलेल्या चिरणे कदाने या गावाचा असून पूर्वी बारमाही पाहिली आहे, पण गेल्या २ दशकात बुराईच्या काठावर ८ महिने पाणीटंचाई असते म्हणून एकेकाळी बारमाही वाहणारी बुराई नदीला पुन्हा एकदा बारमाही करण्यासाठी जयकुमार रावल तरुण उमदा नेता भर उन्हात पायपीट करून साठवण बंधार्‍याच्या कामाचे भूमीपूजन करत निघाला आहे... त्यांच्या या स्तुत्य उपक्रमात मी देखील सहभागी व्हावे आणि आजच्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी मी देखील या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी झाल्याची भावना चिरणे कदाने येथील सेवानिवृत्त शिक्षक गैधल पांडू तावडे यांनी व्यक्त केली आहे.
चिरणे कदाने येथील ९५ वर्षीय श्री तावडे आणि त्याचे ८० वर्षीय मित्र लकडू धाकू पाटील यांनी तरुण पिढी समोर एक आदर्श उभा करून निशाणे ते अलाने हे ७ किमी चे अंतर दुपारी १२ ते १ या वेळेस सूर्य आग ओकत असतांना पार केले मंत्री जयकुमार रावल यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी बुराई परिक्रमा यात्रेत सहभाग घेतला
देश पारतंत्र्यात असताना त्यांनी शिक्षण घेतले, देश स्वतंत्र होण्याआधी ते ब्रिटीश सरकारच्या काळात नोकरीस सुरवात केली, देशातील स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी लढताना पाहिले आहे, देशात पडलेले अनेक भीषण दुष्काळ, रोगराईचे बळी त्यांनी पाहिले आहेत आणि २ दशकापासून बुराई काठावर असलेली तिव्र पाण्याची टंचाईच्या झळा देखील त्यांनी सोसल्या आहेत म्हणूनच त्यांना बुराई परिक्रमा यात्रेचे महत्व तरुणांना समजावे म्हणूनच स्वतः सहभागी होऊन त्यांनी आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
 
गैधल तावडे व लकडू पाटील यांच्या
सहभागाने भारावलो ः ना. रावल
बुराई परिक्रमा यात्रा काढण्याचा उद्देश हा बुराई नदीवरील ३४ बंधार्‍यांची पायाभरणी करत पाण्याचे महत्व भावी पिढीला समजावे या हेतूने काढली होती, परंतु आज माझ्यासोबत ७ किमीचा प्रवास करणारे ९५ वर्षीय गैधल तावडे आणि ८० वर्षीय लकडू पाटील यांच्या सहभागाने मला मोठी ऊर्जा प्राप्त झाली आहे. त्यांच्या सहभागाने मला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आजचा दिवस हा कधीही विसरू शकत नाही, या दोन्ही माझ्या आजोबांनी तरुण पिढीसमोर आदर्श उभा केला, अशा समर्पक व हद्य शब्दांत ना. जयकुमार रावल यांनी त्यांचे कौतुक केले
 
 
Tags: