Video : अश्विनीला पाहून 'त्याने' फुलवला पिसारा...!
महा एमटीबी   13-Apr-2018प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आज त्यांच्या फेसबुकवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला फार विशेष किंवा वेगळं काही वाटतं नाही. पण अखेरच्या काही सेकंदात मन प्रसन्न होणारे दृश्य या व्हिडिओ मधून आपल्याला बघायला मिळेल. कॅलिफोर्निया मधील 'पायनोली' शहरातील पर्यटनाच्या वेळेसचा व्हिडिओ भावे यांनी पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांच्या मागे एक मोर दिसत असून व्हिडिओच्या शेवटी हा मोर अक्षरशः संपूर्ण पिसारा फुलवून आपल्यासमोर उभा राहतो. सध्याच्या जमान्यात खूपच दुर्मिळ असलेले हे दृश्य असल्याने फारच विलोभनीय वाटते.