मध्यरात्री इस्रोची अवकाशझेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

आयआरएनएसएस-१आय उपग्रहाचे मध्यरात्री यशस्वी प्रक्षेपण




श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने काल मध्यरात्री आपल्या आणखी एका दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आयआरएनएसएस-१आय असे या उपग्रहाचे नाव असून भारतीय सागरी प्रदेशातील योग्य स्थितीची माहिती घेणे, दिशादर्शवणे तसेच नकाशे तयार करण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
काल मध्यरात्री बरोबर १२ वाजता या उपग्रहाचे प्रक्षेपन करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून पीएसएलवी-सी ४१ या यानाच्या सहाय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळामध्येच उपग्रहाची त्याच्या योग्य कक्षेमध्ये यशस्वी स्थापना करण्यात आली. यानंतर ही मोहीम यशस्वी झाल्याचे इस्रोकडून जाहीर करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रोच्या या कामगिरीचे कौतुक करत, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे यासाठी अभिनंदन केले आहे.



आयआरएनएसएस-१आय हा इस्रोच्या दिशादर्शक मोहिमांमधील एक महत्त्वाचा उपग्रह आहे. या उपग्रहामुळे भारतीय सागरी प्रदेशात तैनात असलेल्या भारतीय नौदलाला तसेच सागरी प्रदेशातून जात असलेल्या व्यापारी जहाजांना योग्य दिशा दाखवण्यासाठी याची मदत होणार असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले. याचबरोबर भारत आणि आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याचे योग्य नकाशे तयार करण्यासाठी देखील या उपग्रहाचा खूप फायदा होणार आहे, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@