भारतीय निवडणुकांच्या वेळी काळजी घेऊ
महा एमटीबी   11-Apr-2018

मार्क झुकेरबर्गची अमेरिकन सिनेटसमोर कबुलीवॉशिंग्टन डीसी :
फेसबुक डेटा लीकचा कसलाही परिणाम भारतीय निवडणुकांवर होणार नाही. या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी कबुली फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने दिली आहे. अमेरिकन सिनेटसमोर चौकशीला उपस्थित झाल्यानंतर आपल्या वक्तव्यामध्ये त्याने याविषयी माहिती दिली.

आपल्या दोन तासांच्या चौकशीमध्ये मार्कने फेसबुकचा डेटा लीक झाला असल्याची कबुली दिली. अमेरिकेच्या निवडणुकांवेळी देखील फेसबुकच्या डेटा वापरला गेल्याचा आरोप काही लोकांकडून होत असल्यामुळे आता जगभरात होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरीने काम करण्याचे फेसबुकने ठरवले असल्याचे त्याने म्हटले. २०१८ हे अमेरिकेबरोबरच जगभरातील अनेक देशांच्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे वर्ष असल्याचे मार्कने म्हटले. २०१८ नंतर भारत, पाकिस्तान, ब्राझील, मॅक्सिको आणि हंगरी या देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावेळी फेसबुकच्या माध्यमातून खोटे आयडी तयार करून खोटी माहिती अथवा चुकीच्या गोष्टी समाजात पसरवल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न फेसबुक करेल, असे आश्वासन त्याने यावेळी दिली.
फेसबुक डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या ४४ सिनेट अधिकाऱ्यांनी मार्कची आज चौकशी केली. फेसबुकची प्रायव्हसी आणि डेटा लीक प्रकरणी करण्यात आलेल्या अनेक आरोपांची यावेळी सिनेटकडून छाननी करण्यात आली. मार्कने देखील सिनेटच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देत, डेटा लीक झाला असल्याची कबुली दिली. तसेच भविष्यात असे होऊ नये, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी देखील त्याने यावेळी सिनेटला माहिती दिली.