सरकारी आणि खासगी क्षेत्रांनी मिळून काम करणे गरजेचे : सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |



चेन्नई : 'देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी काम केले पाहिजे' असे मत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्यक्त केले. चेन्नई येथे आयोजित 'डिफेन्स एक्सपो-२०१८' या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आज त्या बोलत होत्या.
'देशातील तंत्रज्ञान आता झपाट्याने बदलत आहे. देशातील खासगी व्यापारिक क्षेत्र मोठ्या वेगाने वाढत निघाले आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरून भारतीय व्यापार क्षेत्र विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्र मोठ्या गतीने विकसित होत आहे. त्याच बरोबर सरकारी क्षेत्रांनी देखील तंत्रज्ञानामध्ये मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची भर घालण्यासाठी या दोन्ही क्षेत्रांनी एकत्र आले पाहिजे' असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला संरक्षण सामग्रीसाठी स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न पहिले आहे. यासाठी भारत सरकारने परदेशी संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूकीसाठी अत्यंत पूरक वातावरण देखील तयार केला आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा. सैन्येबरोबर चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या बाबी लक्षात घ्याव्यात आणि त्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी म्हटले.




भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लढाऊ विमाने, रणगाडे आणि हत्यारांची माहिती सामन्या नागरिकांना व्हावी, तसेच स्वदेशी आणि विदेशी कंपन्यांनी भारत संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतणूक करावी, या उद्देशाने भारत सरकार आणि डीआरडीओकडून या चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही विदेशी कंपन्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. 



@@AUTHORINFO_V1@@