होमिओपॅथीत होतो रुग्णाचा सर्वांगीण विचार
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
 
 
 
होमिओपॅथिक औषधयोजना करीत असताना रूग्णाच्या विशिष्ट आजारावरच औषधोपचार केला जात नाही तर रूग्णाचा सर्वांगीण विचार करून औषध योजना होते. या पध्दतीने औषध योजना केल्यास रोगी व्याधीमुक्त तर होतोच, परंतु रूग्णाच्या सर्व शरीरसंस्थांना आरोग्य लाभ होतो.
 
जीर्ण व्याधीवर (उहीेपळल वळीशरीशी) औषधोपचार बरेच दिवस करावा लागतो. याचे मुख्य कारण असे की, असा जीर्ण व्याधीग्रस्त रूग्ण इतर शास्त्रातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचे औषधोपचार करून मुळातील जीर्णव्याधी बरोबरच त्या-त्या औषधांच्या वाईट प्रतिक्रिया आणि औषधीजन्य दुष्परिणाम सोबत घेऊन येतो. अशा रूग्णावर औषधीयोजना करताना मूळ रोग कोणता आणि औषधीजन्य कोणता? हे निश्‍चित व्हायलाच खूप कालावधी लागतो. नंतर ते दुष्परिणाम घालविण्यास काही काळ खर्च होतो. त्यानंतर मूळ रोगावर औषधोपचार सुरू होतो. रूग्णाने सुरूवातीलाच होमिओपॅथी उपचार केला तर रोगमुक्त होण्यास वेळ लागत नाही.
 
पश्‍चिम जर्मनी हे होमिओपॅथिक चिकित्साप्रणालीचे मूळ जन्मस्थान. तेथील आधुनिक वैद्यकशास्त्रातील म्हणजे ऍलोपॅथीतील अत्युच्च पदवीधर, ग्रॅज्युएट विख्यात डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे या शास्त्राचे मूळ जनक. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी निसर्गनियमांवर आधारित तर्कसंगत अशी ही शास्त्रशुध्द चिकित्साप्रणाली त्यांनी संशोधिली. त्या काळातील रोगनिदान आजच्या तुलनेत तर्कदुष्ट होते आणि त्यामुळे उपचार पध्दतीही क्लेशदायक आणि जीवघेण्या स्वरूपाच्या असत.
 
 
 
वैद्यकीय व्यवसाय बंद करून त्यांनी शास्त्रशुध्द रोगनिदान आणि उपचार यांच्या संशोधनाला स्वत:ला वाहून घेतले. अनेक प्रयोग करून ज्या दिवशी त्यांची खात्री पटली त्या दिवशी होमिओपॅथी वैद्यकशास्त्राचा म्हणजे समचिकित्सा पध्दतीचा जन्म झाला.
समचिकित्सा म्हणजे ज्या वनस्पती, पदार्थ किंवा औषधी म्हणून जी चिन्हे आणि लक्षणे दुरूस्त करतात तेच औषध निरोगी व्यक्तीस दिल्यास तसल्याच प्रकारची चिन्हे आणि लक्षणे निर्माण करतात. थोडक्यात, काट्याने काटा काढणे वा सम: समं शममंती किंवा लाईक क्युअर बाय लाईक्स किंवा सीमिलिया सीमिलिबस क्युरेंटर या चिकित्साप्रणालीतील उल्लेखनीय वैशिष्टये अशी की, होमिओपॅथी औषधांच्या प्रदीर्घ सेवनानेही कुठल्याच प्रकारची हानीकारक प्रतिक्रिया म्हणजे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. रोगाचे समूळ निर्मूलन तर होतेच सोबत रूग्णास स्थायी स्वरूपाचा आरोग्यलाभ होतो.
 
 
 
होमिओपॅथीक औषधयोजना करीत असताना रूग्णाच्या विशिष्ट आजारावरच औषधोपचार करीत नाहीत तर रूग्णांचा सर्वांगीण विचार करून औषध योजना करतात. या पध्दतीने औषध योजना केल्यास रोगी व्याधीमुक्त तर होतोच, परंतु रूग्णाच्या सर्व शरीरसंस्थांना आरोग्यलाभ होतो.
 
 
 
दुसरा एक समज आहे की, होमिओपॅथी औषधे केवळ जुनाट विकारांवरच म्हणजे उहीेपळल वळीशरीशी वरच परिणामकारक आहेत. उदा. पुन्हा-पुन्हा उद्भवणारा दमा, टॉन्सिल्स, ऍलर्जिक विकृती, रक्तदाब विकृती, संधीवात, त्वचारोग, डोकेदुखी, अर्धशिशी, मस्तकशूळ, आंत्रवण म्हणजे अल्सर, स्त्रियांच्या बाबतीत मासिकपाळीच्या तक्रारी आणि तद्जन्य विकार. जीर्ण व्याधीवर होमिओपॅथी चिकित्साप्रणालीची औषधे अन्य वैद्यकीय औषधी प्रणालीपेक्षा तौलनिकदृष्ट्या अधिक परिणामकारक ठरली आहेत. म्हणून काही होमियोपॅथी औषधे आशुकारी विकारावर परिणामकारक नाहीत असे नव्हे. आशुकारी विकारावर उदा. विषाणूज्वर म्हणजे गोवर, कांजण्या, मलेरिया, रक्तस्त्राव, सर्दी, खोकला आदी रोगांवर या औषधोपचाराने अद्भूत परिणाम दिसतो.
 
 
 
होमिओपॅथी शास्त्रात शल्यचिकित्सा आहे काय? असाही प्रश्‍न बर्‍याचवेळा विचारण्यात येतो. याबाबत सांगायचे तर वेगवेगळ्या चिकित्साप्रणालीची वेगवेगळी शल्यचिकित्सा असू शकत नाही. फरक असलाच तर शल्यचिकित्सेशिवाय रोगमुक्ती आहे किंवा नाही याबाबतीत संभवतो. (उदा.ढेपीळश्री ीींेपश ळप लश्ररववशी, णीशींरी घळवपशू ज्याला आपण मूतखडा म्हणतो आदी.) परंतु आंत्रपीळमध्ये शल्यचिकित्सा व्यतिरिक्त पर्याय नसतो. कोणत्याही चिकित्सा प्रणालीच्या वैद्यकीय व्यावसायिकांना तिचा वापर आवश्यकतेनुसार करता येतो. शल्यचिकित्सा ही कोणत्याही एका विशिष्ट चिकित्साप्रणालीची नसून वैद्यकशास्त्रातील तो एक स्वतंत्र विभाग आहे. दुसरा प्रश्‍न उद्भवतो तो, होमिओपॅथीक औषधोपचारांतर्गत पथ्याच्या बाबतीत. अनैसर्गिक, अनिर्बंध, मुक्त, स्वच्छंद जगणार्‍या आजच्या युगातील रुग्णास होमिओपॅथीक औषध घेताना पाळावयाच्या पथ्यांचे संकट वाटणे साहजिक आहे. परंतु, एक महत्त्चाची सूचना केल्याशिवाय राहवत नाही की, आपली स्वैर, निरंकुश आहार-विहार, आचार जीवनपद्धती आपल्या बहुतांश तक्रारीस जबाबदार आहे. अशावेळी व्याधीमुक्तीसाठी होमिओपॅथीक औषध घेताना आपल्या प्रकृतीस पथ्यकारक असे निर्बंध घातल्यास व्याधीमुक्तीचा आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल. त्यासाठी ज्या व्यक्तींना पदार्थांनी त्रास होतो त्यांनी ते सेवन करू नयेत, एवढेच सांगणे आहे. दुसरे कटाक्षाने पाळायचे पथ्य म्हणजे, औषधोपचार सुरू असताना तीव्र वासाचे पदार्थ आणि ज्यात औषधीजन्य गुणधर्म आहेत असे पदार्थ जसे कॉफी, तंबाखू, कच्चा कांदा, लसूण, धूम्रपान, गुटका इत्यादींचे सेवन मुळीच करू नये. सुगंधित द्रव्यांचा वापर करणे टाळावे. ही पथ्ये पाळल्यास औषधांचा त्वरित व चांगल्याप्रकारे परिणाम दिसून येतो.
 
- डॉ.विलास महाजन