Raazi Trailer : ''वतन के आगे कुछ नहीं''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |




पुणे :
एक मुलगी, एक पत्नी आणि आणि एक देशाची हेर.. ह्या व्यक्तिरेखा तीन वेगवेगळ्या नसून एकाच मुलीच्या आहेत. एक सामान्य घरातली मुलगी ते देशासाठी हेरगिरी करणारी गुप्तचर अधिकारी असा प्रवास राझी सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे. देशाची गुप्तहेर म्हणून जाण्यासाठी लागणारी मानसिक आणि शारिरीक तयारी, लग्न करून जात असल्यामुळे त्यामुळे निर्माण होणारी नवीन नाती त्यातली गुंतवणूक आणि शेवटी आपण फक्त देशासाठीच आहोत स्वत: च्याही आधी ही जाणिव अश्या अत्यंत कठीण व्यक्तिरेखा या मुलीची आहे. ही व्यक्तिरेखा साकारली आहे आलिया भट हीने. अत्यंत शांत, संयमी आणि खंबीर भूमिका आलियानी साकारली आहे असे ट्रेलर पाहून लक्षात येते. आलियाचा हा दुसरा असा चित्रपट आहे ज्यात ती वेगळ्या धाटणीच्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारत आहे.



या सिनेमामध्ये एकूणच तिचा प्रझेन्सस् हा गूढ दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. १९७१ साली एका मुलीला भारताकडून पाकिस्तानात पाठविण्यात आले होते. यावर आधारित हो सिनेमा आहे. या सिनेमामध्ये मसान फेम विकी कौशल याने आलियाच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केला आहे. तसचं या सिनेमाची पटकथा ही मेघना गुलजार आणि भवानी अय्यर यांनी लिहिली आहे. तर, याचं संगीत शंकर एहेसान लॉय यांचं आहे. ११ मे ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.



आलिया बरोबर मराठमोळी अमृता चमकणार!

मराठमोळ्या अमृता खानविलकरला आत्तापर्यंत काही हिंदी चित्रपटातून छोट्या संधी मिळाल्या आहेत पण आलियाच्या 'राझी'मधून तिला मिळालेली संधी मोठी आहे. या संधीचे ते नक्कीच सोनं करेल याची खात्री तिच्या चाहत्यांना आहे!

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@