१२ वर्षांच्या खालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा
 महा एमटीबी  09-Mar-2018
 
 

 
 
 

राजस्थान विधानसभेत विधेयक पारित
 
 
राजस्थान : राजस्थान विधानसभेने आज मोठे विधेयक पारित केले आहे. १२ वर्षाच्या अथवा त्याखालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा होणार या संबंधीचे विधेयक आज राजस्थान विधानसभेत पारित करण्यात आले आहे. असे विधेयक पारित करणारे राजस्थान हे दुसरे राज्य आहे.
 
 
याआधी मध्यप्रदेश या राज्याने हे विधेयक पारित केले होते. या विधेयकामध्ये ३७६ क आणि ३७६ घ या दोन नवीन कलमांना आयपीसीमध्ये जोडण्यात आले आहे. सामूहिक कुकर्म ३७६ घ कलमामध्ये समाविष्ट केले गेले आहे. या विधेयकामध्ये १२ वर्षाखालील मुलीवर कुकर्म केल्यास आता सक्तीने फाशीची शिक्षा दिली जाईल असे नमूद करण्यात आले आहे.