रजनीकांत यांची फेसबुक आणि इंट्राग्रामवर एन्ट्री
 महा एमटीबी  07-Mar-2018
 
 
 
 
 
 
 
द सुपरस्टार रजनीकांत यांची नुकतीच फेसबुक आणि इंट्राग्रामवर एन्ट्री झाली आहे. आज सकाळी त्यांची सोशल मिडीयावर एन्ट्री झाली आहे. राजकारण आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात सक्रीय असणारे रजनी आता सोशल मिडीयावर देखील सक्रीय झाले आहे. 'वणक्कम' लिहित रजनीकांत यांनी फेसबुकवर आपली पहिली पोस्ट अपलोड केली आहे.
 
 
 
 
 
 
रजनीकांत यांनी पहिल्या पोस्टमध्ये त्यांच्या चाहत्यांना 'नमस्कार' केले आहे. तर इंट्राग्रामवर त्यांनी 'कबाली' चित्रपटातील त्यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यांच्या सोशल मिडीयावर येण्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी ट्वीटरवर एन्ट्री केली होती.
 
 
 
                                  
 
 
 
आता त्यांच्या फेसबुक आणि इंट्राग्रामवर येण्याने रजनीकांत यांच्या मनात नेमके काय सुरु आहे याबद्दल जरा शंकाच निर्माण होत आहे. आज सकाळीच रजनीकांत यांनी आपले अकाऊंट काढले असले तरी देखील आतापर्यंत त्यांचे फेसबुकवर १५९,३९२ फॉलोअर्स झाले आहे. तर फेसबुकवर त्यांना १५८,३४० लाइक्स मिळाले आहेत. तर इंट्राग्रामवर त्यांचे १४३ हजार फॉलोअर्स झाले आहेत.