अनुष्का शर्माचा परी होण्यापर्यंतचा प्रवास
 महा एमटीबी  07-Mar-2018
 
 
 
 
 
 
प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘परी’ या चित्रपटातील काही दृश्य छायाचित्रीत करतांना अनुष्का शर्माला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे दाखविणारा व्हिडीओ अनुष्का शर्माने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘परी’ चित्रपटाचा संपूर्ण प्रवास तिने सांगितला आहे.
 
 
 
परीचा मेकअप करतांना तिला काय त्रास झाला तसेच यावेळी तिला कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागले याचा रोचक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे डोक्यावरील केस, नख आणि तिचा चेहरा अत्यंत क्रूर दिसत आहे. हे सगळे छायाचित्रण करतांना तिला मेकअप करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
 
 
 
 
सध्या हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना अनुष्काचा नवा लुक आवडत आहे. त्यामुळे या चित्रपटाला अजून जास्त प्रेक्षक जावे यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तुम्ही देखील जरूर पहा हा व्हिडीओ...