बॉलीवूडच्या ‘शम्मी आंटी’च आज निधन
 महा एमटीबी  06-Mar-2018
 
 
 
 
 
 
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘नरगीस रबाडी’ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. बॉलीवूडची ‘शम्मी आंटी’ म्हणून त्यांना ओळखले जात होते. ‘देख भाई देख’ यातून निखळ हसविणारी आजी यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. बऱ्याच चित्रपटात त्यांनी आजीची भूमिका निभावली होती.
 
 

 
 
 
गोपी किशन, हम साथ साथ है, कुली नं.१, घर संसार, कंगन, भाई-बहन, दिल अपना और प्रीत पराई अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. आज मुंबईमध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे.
 
 
 
 
 
बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्वीटर अकाऊंटवरून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. बॉलीवूडमध्ये बऱ्याच वर्षांचा अनुभव असणारी तसेच तरुणपणी काम करून वृद्ध झाल्यावर देखील बॉलीवूडमध्ये आजीचा अभिनय करणारी ‘शम्मी आंटी’ आता आपल्यात नाही. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटातील त्यांची दादीची भूमिका सगळ्यांच्याच नेहमी लक्षात राहील.