इरफानला कोणता दुर्मिळ आजार झाला असेल?
 महा एमटीबी  06-Mar-2018

 
 
इरफान खान आज बॉलीवूड इंडस्ट्रीमधला एक वेगळ्या धाटणीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. बरेच वर्ष संघर्ष केल्यावर गेल्या काहीवर्षांत त्याला यश प्राप्त झाले आहे. पण पुन्हा एकदा आयुष्याशीच संघर्ष करण्याची वेळ त्याच्यावर अली आहे की काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. कारण स्वतः इरफानने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे व त्यातुन असं स्पष्ट होतंय की त्याला दुर्मिळ आजार झाला आहे.
 
 
पोस्ट मध्ये सविस्तर लिहिताना इरफान म्हणतोय की, ''गेल्या पंधरा दिवसांपासून माझे आयुष्य रहस्यमय झाले आहे. मला दुर्मिळ आजार झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे, पण मी हार मानणाऱ्यातला नाही; मी आयुष्याशी संघर्ष करणारच. माझे कुटुंब व मित्रमंडळी माझ्या सोबत आहेतच, यातून योग्य प्रकारे बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही शोधात आहोत. पण तोपर्यंत कृपया कोणत्याही अफवा पसरवू नका, योग्य निदान झाल्यावर आठवड्याभरानंतर मी स्वतःच तुम्हाला माझी ही कहाणी सांगेन. तोवर माझ्या माझ्याकरिता सदिच्छा व्यक्त करा!''
 
 
 
 
 
 
 
 
अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, नम्रीत कौर, डलकर सलमान, मिथिला पालकर, आयुषमान खुराना या कलाकारांसह अनेक चाहत्यांनी इरफानला 'गेट वेल सून'च्या सदिच्छा दिल्या आहेत.  
 
 
६ एप्रिल रोजी 'ब्लॅकमेल' नावाचा इरफानचा नवा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन करीत हल्ली वेगवेगळे फंडे वापरले जातात खरे. पण हा कोणताही प्रमोशनचा प्रकार नसावा असा अंदाज आहे. कारण इरफान सारखा अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वतःच्या आयुष्याशी खेळून चाहत्यांचे मन दुखावणार नाही हे तितकच खरं. इरफानने नुकताच त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. इरफानला या आजारातून बाहेर पडण्याची शक्ती ईश्वर त्याला देवो इतकीच सदिच्छा!