कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याआधी कार्ती चिदंबरम यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आज न्यायालयात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
 
 
पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली असली तरी देखील सीबीआयला संपूर्ण चौकशी करण्यास अजून वेळ हवा आहे यासाठी सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी केली आहे आणि ही मागणी न्यायालयाने मान्य देखील केली आहे. म्हणून आता कार्ती चिदंबरम यांना पुन्हा तीन दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
 
 
कार्ती चिदंबरम यांना आता ९ मार्चला जामीन मंजूर करायचा काय? यावर सुनावणी होणार आहे. कार्ती चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
 
 
 
 
कार्ती चिदंबरम यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून कारवाई सुरु होती मात्र या प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयला त्यांनी सहयोग न केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.  ब्रिटनमधील अघोषित संपत्तीबाबत आयकर विभागाला माहिती द्यावी अशी नोटीस आयकर विभागाकडून त्यांना बजावण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सीबीआयने तपासणी नोटीस देखील जारी केली होता. मात्र कार्ती चिदंबरम् यांनी कसलीही परवा न करता आपले काम सुरु ठेवले होते यामुळे त्यांना  अटक करण्यात आली होती.   
 
 
@@AUTHORINFO_V1@@