अमेरिकेनंतर 'या' देशानेही दिली जेरुसलेमला मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |

मे मध्ये करणार जेरुसलेममध्ये दूतावासचे स्थलांतर





ग्वाटेमाला :
संयुक्त राष्ट्रांचा विरोध पत्करून जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून अमेरिकेने दिलेल्या मान्यतेनंतर आता आणखीन एका देशाने जेरुसलेमला आपला पाठींबा दिला आहे. तसेच अमेरिकेबरोबरच आपले देखील दूतावास कायमस्वरूपी जेरुसलेममध्ये स्थलांतरित करणार असल्याची घोषणा देखील या देशाने केली आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

मध्य अमेरिका खंडामध्ये असलेल्या 'ग्वाटेमाला' या देशाने जेरुसलेमला आपला पाठींबा दिला आहे. जेरुसलेमच्या भूमीवर खऱ्याअर्थाने इस्राइलचाच अधिकार असून गेली अनेक वर्ष इस्राइल आपल्या हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबरच आता ग्वाटेमाला देखील जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता देत आहे, अशी घोषणा ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोराल्स यांनी केली. तसेच अमेरिकेने आपले दूतावास जेरुसलेममध्ये स्थलांतरित केल्यानंतर लगेच दोन दिवसानंतर ग्वाटेमाला देखील आपले दूतावास जेरुसलेमला स्थलांतरित करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

मोराल्स यांच्या या वक्तव्याचे इस्राइलकडून स्वागत करण्यात आले असून जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोराल्स याचे आभार व्यक्त केले आहे. तसेच येत्या मे महिन्यात इस्राइलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाचे निमंत्रण देखील दिले आहे.

दरम्यान येत्या मे महिन्यामध्ये अमेरिका देखील आपल्या दूतावासाचे जेरुसलेममध्ये उद्घाटन करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः यावेळी इस्राइलमध्ये उपस्थित राहणार असून अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर यावर्षीच्या शेवटपर्यंत दूतावासाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@