दलाई लामा यांच्या दिल्लीतील कार्यक्रमाला सरकारचा नकार
 महा एमटीबी  06-Mar-2018

दिल्लीऐवजी धर्मशाला येथे कार्यक्रम घेण्याचे केले आवाहननवी दिल्ली :
तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या नवी दिल्लीतील प्रस्तावित कार्यक्रमाला भारत सरकारने नकार दिला आहे. लामा यांच्या कार्यक्रमाच्या दिवशीच नवी दिल्लीमध्ये चीन दूतावासाकडून देखील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे लामांच्या या कार्यक्रमाचा कसलाही अनपेक्षित परिणाम भारत-चीन संबंधांवर होऊ नये, म्हणून भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान लामा यांच्या कार्यक्रमाला नवी दिल्लीमध्ये परवानगी नाकारल्यानंतर हा कार्यक्रम धर्मशाला येथे घेण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. भारत सरकारच्या विनंतीवरूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला चीनच्या तिबेट प्रशासनाकडून भारतामध्ये 'थँक्यू इंडिया' हे शिबीर राबवण्यात येणार आहे. या शिबिराचा पहिला कार्यक्रम हा राजघाट येथे तर दुसरा भागात त्यागराज स्टेडीयम येथे होणार आहे. दरम्यान कार्यक्रमांच्यामध्येच लामा यांच्या कार्यक्रमाचे नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आले होते. लामा हे तिबेटच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्यामुळे या दरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भारत सरकारकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.