'हे दोघे' आयुष्यात आल्यामुळे सनी लिऑनच कुटुंब झालं पूर्ण!
 महा एमटीबी  05-Mar-2018

 
पॉर्नस्टार अशी ओळख पुसून काढत सनी लिऑन कधी बॉलीवूडमध्ये स्थिरावली कळलं सुद्धा नाही. तिची आधीची ओळख पुसताना तिने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पण या सगळ्यातही गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने एक मुलगी दत्तक घेऊन अनेकांची मनं जिंकली. आता आज सनी लिओन आणि डॅनियल वेबर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या नवीन फॅमिलीचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
 
 
अॅशेर आणि नोहन अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत. सनी म्हणतीये सरोगसीपद्धतीने आम्ही या दोघांना जन्म दिला आहे. २१ जून २०१७ ला आम्ही यासंबंधीचे नियोजन केले होते. दरम्यानच्या काळात निशा कौर हिला आम्ही दत्तक घेतलं. आता काही दिवसांपूर्वीच अॅशेर व नोहानचा जन्म झाला असून आता अॅशर सिंग वेबर, नोहान सिंग वेबर व निशा कौर वेबर यांच्या संगतीने आमचे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. देवानी आमच्यासाठी काहीतरी विशेष नियोजन करून आम्हाला मोठे कुटुंब दिले. तीन मुलांचे पालक असल्याचा आम्हा दोघांनाही अभिमान आहे.
 
 
ससनीने पुन्हा एकदा मुलांना दत्तक घेतल्याची चर्चा आज रंगत होती. पण तिने स्वतः याबाबत खुलासा केला असून या दोघांनाही सरोगसी पद्धतीने जन्म दिला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.