कॉंग्रेस संपवणारे स्वतःच संपून जातील : अशोक चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |



लातूर :
देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही रूजवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र आज सत्तेवर आलेले लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करित आहेत. परंतु कॉंग्रेस संपू पाहणारे हेच लोक संपून जातील, असे वक्तव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात बोलत होते.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षांमध्ये खोटी जाहिरातबाजी आणि फसवी आश्वासने देण्यापलीकडे भाजप सरकारने काहीच केलेले नाही. सरकारच्या मनमानी आणि अताताई कारभारामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे अशा सरकारला सत्तेतून खाली ओढण्यासाठी सर्व नागरिकांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
 
याच बरोबर भीमा कोरेगाव येथे झालेल्या दाग्दफेकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या पक्षीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा सत्तेत बसलेल्या लोकांचा डाव आहे. भीमा कोरेगावची दंगल याचेच उदाहरण आहे. या दंगलीतला आरोपी संभाजी भिडेला पद्मश्री देण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती अशी बातमी वर्तमानपत्रात आली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भिडेला अटक का केली जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. समाजातील सर्वच घटकांत सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांचा आवाज बनून रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संघर्ष करावा, असे आवाहन देखील  ते यावेळी म्हणाले. 

 
शिबिराला देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, डॉ. रत्नाकर महाजन, उल्हास पवार, दिलीप देशमुख, बस्वराज पाटील, अमित देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनिताताई आरळीकर यांनी मार्गदर्शन केले.
@@AUTHORINFO_V1@@