कंगना आणि राजकुमार असे वेड्यासारखे का दिसताहेत?
 महा एमटीबी  05-Mar-2018
 
 

 
 
 
 
अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव हे आजकाल वेड्यासारखे का वागताहेत असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल मात्र हे दोघेही आपल्या नव्या चित्रपटासाठी असे वागताहेत. ‘मेंटल है क्या’ हा या दोघांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे.
 
 
 
 
या पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार हे दोघेही वेड्यासारखे चाळे करतांना दिसत आहेत. कंगनाला या पोस्टरमध्ये तिरळे डोळे करतांना दाखवण्यात आले आहे तर राजकुमार याला वेगळ्याच रुपात या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘सामान्य राहणे हे कंटाळवाणे आहे आणि वेडा हा सामान्य आहे’ अशा टॅग लाईनचे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर खूप शेअर होत आहे. टीव्ही आणि चित्रपट निर्माती  एकता कपूर हिने देखील हे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.
 
 
 
 
या चित्रपटात कंगना आणि राजकुमार राव या दोघांच्या काय भूमिका असणार आहे हे सध्या सांगण्यात आले नाही मात्र हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असे तरी या नवीन पोस्टरवरून दिसून येत आहे. सध्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यातच आहे मात्र लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाईल.