'शेप ऑफ द वॉटर'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार
 महा एमटीबी  05-Mar-2018

 
 
जग प्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि यामध्ये १३ श्रेणींमध्ये नामांकित झालेल्या 'शेप ऑफ द वॉटर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ४ पुरस्कार मिळाले आहेत.
 
 
 
यामध्ये दिग्दर्शक गिलियेरमो देल तोरो ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याशिवाय 'ओरिजिनल स्कोर' आणि 'प्रोडक्शन डिझाइन' अशा दोन श्रेणींमध्ये देखील या चित्रपटाने सिनेक्षेत्रातील सगळ्यात अधिक मानाचा पुरस्कार म्हणजेच 'ऑस्कर पुरस्कार' पटकावला आहे.
 
 
 
 
 
सर्वोक्तृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीसाठीचे ऑस्कर पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत 'डार्केस्ट अवर’ या चित्रपटातील विंस्टन चर्चिल यांच्या भूमिकेसाठी गॅरी ओल्डमॅनला पुरस्कार देण्यात आला, तर 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी' या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी फ्रांसिस मैकडोरमैंड यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
 
 
 
 

ऑस्कर पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'द शेप ऑफ वॉटर'

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसिस मैकडोरमैंड

सर्वोत्कृष्ट अभिनेता : गैरी ओल्डमैन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाचे दिग्दर्शक गिलियेरमो देल तोरो

सर्वोत्कृष्ट गाणे : चित्रपट 'कोको' मधील 'रीमेंबर मी' या गाण्यासाठी क्रिस्टन एंडरसन- लोपेज आणि रोबर्ट लोपेज यांना पुरस्कार

ऑरिजनल स्कोर: 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटासाठी अलेक्सांद्रे डेसप्लाट यांना

सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी: 'ब्लेड रनर 2049' या चित्रपटासाठी डिकिन्स यांना

ऑरिजनल स्क्रीनप्ले: 'गेट आउट' या चित्रपटासाठी जॉर्डन पीले यांना

अडाप्टेड स्क्रीनप्ले: 'कॉल मी बाय यूअर नेम' या चित्रपटासाठी जेम्स आइवरी यांना

लाइव एक्शन शॉर्ट : 'द साइलेंट चाइल्ड' या चित्रपटासाठी क्रिस ऑवरटन आणि रेचल शेंटों यांना

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट: 'हेवन इज ए ट्रैफिक जैम ऑन द 405'

सर्वोत्कृष्ट एडिटिंग: 'डनकर्क' या चित्रपटासाठी ली स्मिथ यांना

सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट्स: 'ब्लेड रनर 2048' या चित्रपटासाठी जॉन नेलसन, गर्ड नेफजर, पॉल लेमबर्ट आणि रिचर्ड आर. ह्यूवर यांना

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट : 'कोको' या चित्रपटासाठी ली उनकिर्च आणि डार्ला के एंडरसन यांना

एनिमेटेड लघुपट : 'डियर बास्केटबॉल' साठी ग्लैन कीन आणि कोबी ब्रायंत यांना

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : एलिसन जैनी यांना 'आई, तान्या' या चित्रपटासाठी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सैम रॉकवैल यांना 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी" या चित्रपटासाठी.

परकीय भाषा चित्रपट : चिली यांच्या 'अ फैंटास्टिक वूमेन' या चित्रपटाला पुरस्कार

प्रोडक्शन डिजाइनः 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटासाठी पॉल डेनहैम ऑस्टरबेरी, शेन विआऊ आणि जेफ्री ए. मेल्विन  यांना

साउंड मिक्सिंगः 'डनकर्क' चित्रपटासाठी ग्रैग लैंडेकर, गैरी ए. रिज्जो आणि मार्क वाइनगार्टन यांना

साउंड एडिटिंगः 'डनकर्क' चित्रपटासाठी रिचर्ड किंग आणि एलेक्स गिब्सन यांना. 

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीः 'इकारस' साठी ब्रियान फोगेल आणि डैन कोगन यांना.

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : 'फैंटम थ्रेड' चित्रपटासाठी मार्क ब्रिजेस यांना.

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशसज्जा : 'डार्केस्ट ऑर' या चित्रपटासाठी काजुहिरो सुजी, डेविड मेलिनॉस्की आणि लुसी सिबिक यांना.