देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते आज लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निळंगेकर उपस्थित होते. मराठवाड्याला सुवर्ण काळ प्राप्त करून देणारा हा भूमिपूजन सोहळा होता.
 
 
 
 
लातूरमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन आज करण्यात आले असून यात दोन चरणांमध्ये काम चालणार आहे. पहिल्या चरणात २५० कोच तयार करण्याचे लक्ष्य आहे तर दुसऱ्या चरणात ४०० डब्बे तयार करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. ५०० कोटी रुपये लागलेल्या या १५३.८८ हेक्टर जमिनीवर या फॅक्टरीचे निर्माण करण्यात येणार आहे. 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@