पाकिस्तानात आता बाहुबली आणि सैराटची धूम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

 
 
मुंबई - पाकिस्तानातील कराची येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये सैराट, बाहुबली आणि डिअर झिंदगी या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये २९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या फिल्म फेस्टीवलमध्ये भारतातून सैराट व बाहुबलीसह एकूण ९ चित्रपट निवडण्यात आले आहेत.
 
 
 
 
महाराष्ट्रासाठी महत्वाची बाब म्हणजे यामध्ये सैराट हा एकमेव मराठी चित्रपट असणार आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
 
आता पर्यंत जगातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सैराटला स्थान मिळाले आहे. सैराट बरोबरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बाहूबली तसेच डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स हे चित्रपट सुद्धा दाखवले जाणार आहेत. याबद्दल राजमौली यांनी आनंद व्यक्त करत, "आतापर्यंत बाहुबलीमुळे मला अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये जाण्याची संधी मिळाली. मात्र यामध्ये सगळ्यात उत्साहाची बाब म्हणजे कराची चित्रपट महोत्सव."
 
 
 
 
 
काही काळाआधी पाकिस्तानी कलाकारांमवर भारतामध्ये नाराजी असल्याकारणाने आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या तणावामुळे कलासृष्टीविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता कराची महोत्सवात ९ भारतीय चित्रपटांना स्थान मिळाल्यानंतर यावर इतर कलाकारांची काय प्रतिक्रिया असणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@