ट्रेलर वरुन तरी वाटतंय की खूप हसू येणार..
महा एमटीबी   28-Mar-2018

 
 
मुंबई :  ४ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या १०२ नॉट आउटचे आज आणखी एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. या ट्रेलरला बघून हा चित्रपट आपल्याला नक्कीच खूप हसवणार असा अंदाज बांधता येवू शकतो. तब्बल २७ वर्षांनी अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्साह आहे.
 
 
 
 
 
अमिताभ आणि ऋषि कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यापैकी अमर, अकबर अॅन्थोनी अगदी पहिल्यानंबर वर आहे. या चित्रपटाची कथा गंमतशीर वाटतेय. यामध्ये स्वत: अमिताभ ऋषि कपूर यांच्या पित्याच्या भूमिकेत आहेत. आणि १०२ वर्षाचा बाप आपल्या मुलाला म्हणजेच ऋषि कपूरला वृद्धाश्रमात टाकण्यास निघाला आहे.
 
पिता आपल्या मुलाला वृद्धाश्रमात सोडतोय ही संकल्पनाच मुळी गंमतशीर आहे. त्यातून अमिताभ यात अत्यंत मजेशीर स्वरूपात दिसले आहेत. तर ऋषि कपूर यांना आपण कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटानंतर एका वेगळ्या भूमिकेत बघणार आहोत. त्यामुळे हा सिनेमा बघताना मजा वाटणार असे ट्रेलरवरून तरी दिसते. ४ मे ला चित्रपट बघून याविषयी ठाम मत व्यक्त करता येईल. मात्र या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, यात वादच नाही.