'पाकिस्तान प्रेमीं'ना कठोर शिक्षा करू : शेख हसीना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |


ढाका :
बांगलादेशमध्ये राहून देखील पाकिस्तानचा पुळका येणाऱ्या 'पाकिस्तान प्रेमीना' कठोर शिक्षा करू, असे प्रतिपदान  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले. बांगलादेशचे राजधानी ढाका येथे 'स्वातंत्र्य दिना'निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी बांगलादेशमधील पाकधर्जीन नागरिकांवर त्यांनी जोरदार टीका करत त्यांच्या देशप्रेमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

'पाकिस्तानने कधी काळी बांगलादेशच्या नागरिकांवर प्रचंड अत्याचार केलेले आहेत. पाकिस्तानच्या पाशवी अत्याचारामुळे अनेक बांगलादेशीयांना आपला प्राण गमवावा लागला होता. आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या कित्येक जणांची पाकिस्तानने क्रूरपणे हत्या केली. पाकिस्तान बांगलादेशीयांना इतक्या भयानक आठवणी देऊन सुद्धा बांगलादेशातील काही नेत्यांना आणि नागरिकांना अजून देखील पाकिस्तानचा पुळका येतो. यावरून त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. त्यामुळे अशा 'पाक प्रेमींना' कठोर शिक्षा केली पाहिजे' असे मत त्यांनी व्यक्त केले.

याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक नेत्यांची आणि नागरिकांची आठवण त्यांनी यावेळी केली. तसेच बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या कार्याची आठवण उपस्थितांना करुन दिली. बांगलादेशच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

प्रत्येक वर्षीचा २६ मार्चला बांगलादेशमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तसेच २५ मार्च हा पाकिस्तानच्या पाशवी अत्याचारांच्या स्मरणार्थ देशात 'नरसंहार दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रत्येक वर्षी देशात काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@