फारुख शेख यांच्या ७० व्या जन्मतिथीनिमित्त गूगलचे खास डूडल
महा एमटीबी   25-Mar-2018

 
मुंबई :  भारतीय सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फारुख शेख यांची आज ७० वी जन्मतिथी आहे. त्यानिमित्ताने गूगल डूडलने त्यांना खास आदरांजली दिली आहे. गूगलने आजचे खास 'डूडल' फारुख शेख यांना समर्पित केले आहे. "किसी से न कहना, चश्मे बद्दूर, नूरी, शतरंज के खिलाडी अशा अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
 
 
 
 
अभिनेत्री दीप्ती नवल आणि त्यांची जोडी पडद्यावर प्रसिद्ध होती. त्यांच्या 'तुम्हारी अमृता' या नाटकाला देखील खूप प्रसिद्धी मिळाली होती. तसेच त्यांनी छोट्या प़द्यावर 'जीना इसी का नाम है' या कार्यक्रमाचे निवेदन देखील केले होते. त्यांच्या जीवंत अभिनयामुळे ते विशेष प्रसिद्ध होते.
 
२७ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुबई येथे निधन झाले. त्यांनी अखेरच्या काळात ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूर याच्या वडीलांची भूमिका साकारली होती.