'या' मराठी अभिनेत्रीने ट्विटरवर गाठला २ लाख 'फॉलोवर्स'चा टप्पा!
महा एमटीबी   21-Mar-2018


 
सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड मोठ्याप्रमाणात होऊ लागला आहे. अगदी सेलेब्रेटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचा हे माध्यम हवेहवेसे वाटू लागले आहे. अशातच ट्विटर, इंस्टाग्रामवर असणाऱ्या सेलेब्रेटींची क्रेझ जरा अधिकच असते. मराठी चित्रपट सृष्टीतही हे वार अधिक वेगाने वाहताना दिसत आहे. याचं ताज उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आज दोन लाख फॉलोवर्सचा टप्पा ट्विटरवर पार केला आहे. या माध्यमातून थेट सेलेब्रेटींशी संपर्क होत असल्या कारणाने दिवसेंदिवस याची क्रेझ वाढतच जाणार यात शंका नाही.
 
 
दोन लाख फॉलोवर्सचा टप्पा पार करणारी पहिली मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी होती. आज स्पृहाचे ट्विटरवर ३ लाख ४० हजार ९५८ फॉलोवर्स आहेत. तर अमृताच्या फॉलोवर्सची संख्या २ लाख २९० इतकी आहे. (ही आकडेवारी वृत्त लिहीतानाच्या वेळेसची आहे, कालानुरूप त्यात वाढ होत राहील.) हीच आकडेवारी इंस्टाग्राम बाबत बघितली तर अमृताचे इन्स्टावर पाच लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर स्पृहाच्या फॉलोवर्सची संख्या तिथे मात्र अमृतापेक्षा (३ लाख १४ हजार) कमी आहे.
 
 
 
 
 
 
अमृता खानविलकर सध्या हिंदी सिनेसृष्टीत आपले स्थान अढळ करताना दिसत आहे. एक रिऍलिटी शो, दोन मोठे हिंदी चित्रपट यामुळे अमृताचे सोशल मीडियावरील चाहते वाढणार हे तर नक्कीच होतं. तिच्या आगामी 'राझी' चित्रपटाच्या निमित्ताने तिची आलिया भटशी झालेली मैत्री किंवा काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंग बरोबरचा सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडिओ या गोष्टींमुळे अमृताची क्रेझ अधिक वाढली आहे. स्पृहा आणि अमृतानंतर सोनाली कुलकर्णी (१, ९३, ०६६), सई (१, ७६, ३१३) व प्रिया बापट (१, ६४, ५७६) यांचे अनुक्रमे ट्विटरवर फॉलोवर्स अधिक आहेत.