अनधिकृत जीवनचरित्र प्रकरणी संजय दत्तची लेखकाला कोर्टाची नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 

 
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतो, अश्याच एका विषयावरून संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो विषय म्हणजे त्याच्यावर लिहिले गेलेले अनधिकृत जीवनचरित्र...
  
यासिन उस्मान नावाच्या लेखकाने अनधिकृतपणे संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित "संजय दत्त : द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवूड्स बॅड बॉय" नावाच्या पुस्तकाचे लिखाण केले असून जगरनॉट पब्लिकेशन अंतर्गत ते छापण्यात आले आहे.
 
याविषयीची माहिती संजय दत्तने स्वतः ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. यामध्ये त्याने म्हणले की, या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले प्रसंग हे माझ्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करुन घेतलेले नसून ते ९० च्या दशकांमध्ये झालेल्या मुलाखतींमधील अफवा किंवा गॉसिप्सवरुन घेण्यात आले आहेत, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, त्यामुळे मी माझ्या वकिलांशी चर्चा करुन पुस्तकाचे लेखक यासिन उस्मानला कोर्टाची नोटीस बजावणार आहे. तसेच यापुढे माझ्या जीवनावर आधारित एक पुस्तक येणार आहे, पण त्यामुळे माझ्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला त्याचा त्रास होणार नाही आणि ते अधिकृतही असेल, असेही त्याने सांगितले आहे.
 
 
 
 
दरम्यान यासिर उस्मान याने लिहिलेले "संजय दत्त : द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवूड्स बॅड बॉय" हे पुस्तक जगरनॉट पब्लिकेशन ऑनलाईन वेबसाईटवर फक्त ५० रुपयांत व्हायरल करण्यात आले आहे. तसेच यामध्ये संजय दत्तचे बोर्डिंग शाळेतील शिक्षण, त्याच्या आईचे निधन, त्याला लागलेली ड्रग्सची सवय, त्याची पहिली पत्नी तसेच अंडरवर्ल्डच्या छोटा शकीलकडून त्याला येणारे फोन या आणि अशा अनेक प्रसंगांवर या पुस्तकात लिखाण केले आहे.
 
याबाबत जगरनॉट पब्लिकेशन फेसबुक पेजवरुन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, या पुस्तकात घेतलेल्या प्रसंगांची माहिती ही त्याच्या जवळच्या व्यक्तिंकडून तसेच घरातील सदस्यांकडून मिळवलेली माहिती आहे, त्यामुळे ती अधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
 
 
 
यासिर उस्मान याने याआधी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित "राजेश खन्ना : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडिया्स फर्स्ट सुपरस्टार" आणि अभिनेत्री रेखा यांच्यावरील "रेखा : द अनटोल्ड स्टोरी" ही पुस्तके लिहिली आहेत.
 

 
@@AUTHORINFO_V1@@