बच्चन इज बॅक, अभिषेकचा नवीन लुक
महा एमटीबी   21-Mar-2018

 
 
मुंबई :  हाउसफुल थ्री नंतर चाहत्यांना अभिषेक बच्चनच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर अभिषेकने आज आपल्या पुढील मनमर्झियाँ या चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचविला आहे. यामध्ये अभिषेक शिख सरदारच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
 
 
 
या बद्दल शहंशाह अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिषेकला ट्विटरच्या माध्यमातून संबोधित करत त्यांनी, "तुझी आजी तेजी कौर सूरी, तुझे पणजोबा खजान सिंग सूरी आणि तुझी पणजी अमर कौर सूरी या सगळ्यांना आज तुला असे बघून गर्व वाटत असणार. आणि मला ही वाटतोय" अशा भावना व्यक्त केल्या.
 
 
 
 
 
हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे, तर यामध्ये अभिषेकसह तापसी पन्नू, आणि विकी कौशल देखील आहेत. ७ सप्टेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून अभिषेक 'मल्टी स्टारर' चित्रपटात अधिक दिसून येत आहे, त्यामुळे या चित्रपटात त्याला आपल्या कलेचं योग्य प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. त्या संधीचं चीज होतं का हे बघणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे.